देशाविरुद्ध नारे देणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही - गृहमंत्री

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जेएनयूमध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याची 'जयंती' साजरी करण्यावर मोठा वाद निर्माण झाला. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक भूमिका घेतलीय. 

Updated: Feb 12, 2016, 02:41 PM IST
देशाविरुद्ध नारे देणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही - गृहमंत्री title=

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जेएनयूमध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याची 'जयंती' साजरी करण्यावर मोठा वाद निर्माण झाला. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक भूमिका घेतलीय. 

देशात राहून देशाविरुद्ध नारे देणाऱ्यांना कदापि माफ केलं जाणार नाही. याबद्दल त्यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांनाही संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

देशाविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना आता सरकारच्या कडक भूमिकेला सामोरं जावं लागेल. भारताच्या एकतेवर आणि अखंडतेवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही. 

उल्लेखनीय म्हणजे, या प्रकरणात दिल्लीचे भाजप खासदार महेश गिरी यांनी देशद्रोहाचा आरोप दाखल करण्यात आलाय. या जेएनयूच्या अध्यक्षांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय.