पंतप्रधानांनी 7RCR ला केलं मनमोहन सिंहाचं स्वागत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. मोदी आणि मनमोहन सिंग यांच्यात जवळपास ४५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी भारतीय अर्थव्यवस्था, धोरणं यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. 

Updated: May 28, 2015, 03:40 PM IST
पंतप्रधानांनी 7RCR ला केलं मनमोहन सिंहाचं स्वागत

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. मोदी आणि मनमोहन सिंग यांच्यात जवळपास ४५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी भारतीय अर्थव्यवस्था, धोरणं यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. 

मोदींनी याबाबत त्यांच्याकडून सल्ले घेतल्याचंही बोललं जातंय.. बुधवारी सकाळी डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. मोदींमुळं लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप डॉ. मनमोहन सिंग यांनी केला होता. मात्र संध्याकाळी दोन्ही नेत्यांच्या भेटीनं अनेकांना आश्चर्यचकीत केलं.

या भेटीबाबत मोदींनी ट्विट करुन माहिती दिली.. या बैठकीमुळं आनंद झाल्याचं ट्विट मोदींनी केलं. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.