नवी दिल्ली : प्रत्येकाने नोटावर आरबीआय गर्व्हनर यांची स्वाक्षरी पाहिली असेल. सर्व लहान मोठ्य़ा नोटांवर आरबीआय गर्व्हनर यांची स्वाक्षरी असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील इतर सर्व बँकांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवते. आरबीआयची स्थापना १९३५मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत आरबीआयचे २३ गर्व्हनर झाले आहेत. सध्या रघुराम राजन हे आरबीआयचे गर्व्हनर आहेत.
तुम्हाला माहीत आहे का आरबीआयच्या गर्व्हनरना मासिक वेतन किती मिळते. एकीकडे जिथे उद्योगपतींची मासिक कमाई करोडोच्या घरात असते तिथे आरबीआय गर्व्हनर यांना मासिक वेतन आणि इतर भत्ते मिळून एक लाख ९८ हजार मिळतात.
यानुसार त्यांचे वार्षिक वेतन २३ लाख ७६ हजार इतके आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आरबीआय गर्व्हनर यांचे मासिक वेतन हे एखाद्या आयटी कंपनीतीली वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षाही कमी आहे.