सुकमा नक्षलवादी हल्ला : नेमका कसा करण्यात आला हल्ला...

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा सीआरपीएफच्या जवानांना टार्गेट केलं. या हल्ल्यात 25 जवान शहीद झालेत. गुप्तचर यंत्रणांचं अपयश म्हणून या घटनेकडे पाहिलं जातंय. जवळपास 300 नक्षवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला गेला, कसं शक्य झालं त्यांना हे.... हा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Updated: Apr 25, 2017, 12:09 PM IST
सुकमा नक्षलवादी हल्ला : नेमका कसा करण्यात आला हल्ला...  title=

नवी दिल्ली : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा सीआरपीएफच्या जवानांना टार्गेट केलं. या हल्ल्यात 25 जवान शहीद झालेत. गुप्तचर यंत्रणांचं अपयश म्हणून या घटनेकडे पाहिलं जातंय. जवळपास 300 नक्षवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला गेला, कसं शक्य झालं त्यांना हे.... हा प्रश्न आता उपस्थित होतोय.

नक्षवाद्यांनी केला घात

गुप्तचर यंत्रनांना नक्षवाद्यांच्या या सूडतंत्राचा पत्ताही लागला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, आपल्या नेहमीच्याच योजनेनुसार, नक्षलवाद्यांनी यावेळेसही हल्ला घडवून आणला. मोठ्या संख्येत एकत्र येत नक्षलवाद्यांनी हल्ल्याची रणनीती ठरवली. यातच 25 जवानांना आपले प्राण गमवावे लागलेत. जवानांची या भागातून मूव्हमेंट होणार आहे, हे नक्षलवाद्यांना माहीत होतं... आणि त्यांनी हीच वेळ साधली.

गावकऱ्यांना ढाल बनवलं...

नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना आपली ढाल बनवत जवानांवर हल्ला केला. गावकऱ्यांच्या घरात घुसून त्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर फायरिंग केलं. समोवारी सकाळी जवळपास 8.30 वाजता सीआरपीएफची 74 वी बटालियन जवानांसहीत दुर्गापाल कॅम्पहून रवाना झाली. चिंतागुफाजवळ पोहचल्यानंतर हे जवान दोन गटांत विभागले. त्यांच्यावर रस्ते निर्माण प्रोजेक्टसाठी कॉम्बिंगचं काम सोपवण्यात आलं होतं. तेव्हाच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना या ठिकाणाची माहिती आणण्यासाठी पाठवलं.

छोट्या गटांत विभागून हल्ला

जवानांच्या ठिकाणाची माहिती समजल्यानंतर नक्षलवाद्यांनी 11.30 च्या सुमारास चिंतागुफा - बुर्कापाल - भेजी भागाजवळ छोट्या छोट्या गटांत विभागलेल्या नक्षलवाद्यांन जवानांवर हल्ला केला. या दरम्यान त्यांनी एक आयईडी ब्लास्टही घडवून आणला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार घडवून आणला. यासाठी त्यांनी एके 47 आणि इतर हत्यारांचा वापर केल्याची माहिती मिळतेय.