मी निर्दोष; सीबीआय चौकशी करा : आसारामबापू

स्वयंघोषित धार्मिक गुरू आसारामबापू यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांवरून गेल्या दीड वर्षापासून आसारामबापू तुरूंगात आहेत.

Updated: Jul 13, 2015, 09:35 PM IST
मी निर्दोष; सीबीआय चौकशी करा : आसारामबापू  title=

जोधपूर : स्वयंघोषित धार्मिक गुरू आसारामबापू यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांवरून गेल्या दीड वर्षापासून आसारामबापू तुरूंगात आहेत.

दरम्यान, शहाजहानपूर येथील एका अल्पवयीन मुलीवर आसाराम बापू यांनी केलेल्या कथित अत्याचार प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार, कृपाल सिंह याचा शनिवारी रात्री उशिरा मृत्यू झाला आहे.

'मी निर्दोष आहे. पाहिजे तर सीबीआय अथवा राष्ट्रपती चौकशी करा. या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार कृपाल सिंह याने दिलेला जबाब हा अकरा महिन्यापूर्वीचा आहे', असे आसारामबापू यांना आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.