बर्फाच्या ढिगाऱ्यातून जवानाला सात दिवसानंतर जिवंत काढले

सियाचीनमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली जवान जिवंत सापडला. तब्बल सात दिवस २५ फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकूनही जवान सुरक्षित राहली. त्याला बाहेर काढण्यात यश आलेय.

Updated: Feb 9, 2016, 12:10 PM IST
बर्फाच्या ढिगाऱ्यातून जवानाला सात दिवसानंतर जिवंत काढले title=

नवी दिल्ली : सियाचीनमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली जवान जिवंत सापडला. तब्बल सात दिवस २५ फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकूनही जवान सुरक्षित राहली. त्याला बाहेर काढण्यात यश आलेय.

सियाचीनमध्ये हिमस्स्खलन होऊन पंचवीस फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या भारतीय लष्कराच्या काही जवानांपैकी एक जवान जिवंत अवस्थेत सापडलाय. लान्स नायक हनुमंतअप्पा कोप्पड असं या सैनिकाचं नाव आहे.

Miracle in Siachen: Indian Army soldier found alive after six days under 25 feet of snow

सध्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली गरम तंबूत ठेवण्यात आलं असून त्याला सकाळी आर.आर. हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. या ठिकाणाहून आतापर्यंच चार जवानांचे शव बाहेर काढण्यात आलेत. मात्र हनुमंतअप्पा आश्चर्यकारकरित्या जिवंत सापडल्याने आणखीन काही जवान जिवंत असल्याची आशा आहे.

संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सियाचीनमध्ये हजारो फूट उंचावर सैनिकांची पोस्टिंग देशाच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आल्याचं म्हटलंय. सैनिकांची पोस्टिंग कायम राहणार असून मागे हटण्याचा प्रश्न नसल्याचही पर्रिकर म्हणालेत. ३ फेब्रुवारी रोजी हिम कोसळून ९ जवान शहीद झाले होते.