व्हिडिओ - जेव्हा मोदींनी सभेत खांबावरील दोघांना वाचविले

आम आदमी पक्षाच्या रॅलीमध्ये ज्या पद्धतीने गजेंद्र सिंह याने केलेल्या आत्महत्येमुळे सर्व देशाला हेलावून सोडले. या सभेत गजेंद्र सिंहने आत्महत्या केली त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह आपचे नेते उपस्थित होते. पण आम्ही तुम्हांला एक व्हिडिओ दाखवतो त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत खांबावर चढलेल्या दोघा युवकांना आपल्या चातुर्याने खाली उतरविले होते. 

Updated: Apr 24, 2015, 12:35 PM IST
व्हिडिओ - जेव्हा मोदींनी सभेत खांबावरील दोघांना वाचविले title=

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या रॅलीमध्ये ज्या पद्धतीने गजेंद्र सिंह याने केलेल्या आत्महत्येमुळे सर्व देशाला हेलावून सोडले. या सभेत गजेंद्र सिंहने आत्महत्या केली त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह आपचे नेते उपस्थित होते. पण आम्ही तुम्हांला एक व्हिडिओ दाखवतो त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत खांबावर चढलेल्या दोघा युवकांना आपल्या चातुर्याने खाली उतरविले होते. 

नरेंद्र मोदी गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मेरठमध्ये एका सभेत भाषण करीत होते. त्यावेळी दोन तरूण एका खांबावर चढले होते. त्यावेळी मोदी यांनी व्यासपीठावरून त्या दोघा युवकांना खाली येण्यास सांगितले. इतके नाही तर मोदी यांनी युवकांना चौधरी चरण सिंह यांची शपथ घातली. तुम्ही खूप समजदार आहात असे म्हणून दोन्ही युवकाची प्रशंसा केली. मोदींच्या आवाहनानंतर दोन्ही युवक खाली उतरले होते. 

पाहा हा व्हिडिओ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.