जीशा हत्या प्रकरण; आरोपी करायचा प्राण्यांशी संभोग

केरळमधील चर्चेत असलेल्या जीशा हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहित समोर आली आहे.

Updated: Jun 20, 2016, 03:49 PM IST
जीशा हत्या प्रकरण; आरोपी करायचा प्राण्यांशी संभोग  title=

कोची : केरळमधील चर्चेत असलेल्या जीशा हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहित समोर आली आहे.

या जीशा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमीरुल इस्लामविषयी नवी धक्कादायक माहिती समोर आल्याचं सांगण्यात येत आहे.

पेरुमबावूरमध्ये अमीरुल एका बकरीबरोबर सेक्स करत असल्याचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला. त्यानंतर त्याच्या या लैंगिक विकृतीची माहिती पोलिसांना मिळाली.

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या २९ वर्षाची जीशा २८ एप्रिल २०१६ रोजी रहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. अमीरुलने अत्यंत क्रूर पद्धतीने जीशाची हत्या केली होती. 

केरळ विधानसभा निवडणुकीच्यावेळी हे हत्याकांड झाल्याने विरोधकांनी या विषयाला राजकीय मुद्दा बनवला होता. संपूर्ण केरळमध्ये विविध संघटनांनी जोरदार निदर्शने करुन आरोपीला लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली होती.

अमीरुल लैंगिकदृष्टया विकृत आहे. त्याला प्राण्यांबरोबर संभोग करायची सवय होती. पाळलेल्या बक-यांबरोबर संभोग केल्यानंतर अमीरुल त्यांची हत्या करायचा.

ही माहिती अमीरुलची कसून चौकशी केल्यानंतर अमीरूने दिली आहे. काहीवेळा तो संभोग केलेल्या बकऱ्यांचे गुप्तांग कापून टाकायचा. 

बांधकाम साईटवर अमीरुल काम करायचा. फावल्यावेळेत त्याला मोबाईलवर पॉर्न चित्रपट पाहण्याची सवय होती. एक मजूराने अमीरुलच्या या लैंगिक विकृतीचा व्हिडीओ काढला होता. अमीरुल केरळमधल्या गाजलेल्या जीशा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.