एकमेव संस्कृत वृत्तपत्र होणार बंद!

जगातील एकमेव संस्कृत भाषेतील 'सुधर्मा' हे वृत्तपत्र लवकरच बंद होणार आहे. १९७० साली सामान्य लोकांमध्ये संस्कृत भाषेचा प्रचार करण्याच्या हेतूने कलाले नांदूर वरदराज अय्यंगर यांनी हे वृत्तपत्र म्हैसूर येथून सुरू केले होते.

Updated: Jun 20, 2016, 02:46 PM IST
एकमेव संस्कृत वृत्तपत्र होणार बंद! title=

मुंबई : जगातील एकमेव संस्कृत भाषेतील 'सुधर्मा' हे वृत्तपत्र लवकरच बंद होणार आहे. १९७० साली सामान्य लोकांमध्ये संस्कृत भाषेचा प्रचार करण्याच्या हेतूने कलाले नांदूर वरदराज अय्यंगर यांनी हे वृत्तपत्र म्हैसूर येथून सुरू केले होते.

का बंद होतय हे वृत्तपत्र

अय्यंगर यांचे पुत्र के. व्ही. संपथ कुमार यांनी हे वृत्तपत्र सुरू राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र दिवसेंदिवस खप कमी होत असल्याने तसेच सरकारतर्फे कोणतीही मदत न मिळाल्याने वृत्तपत्र सुरू ठेवणे अवघड झाले आहे.

जागतिक पातळीवर या वृत्तपत्राचे आणि संस्कृत भाषेचे ऐतिहासिक महत्त्व लोकांना समजले असले तरी आपल्या सरकारला ते जाणवत नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

किती आहे वाचकवर्ग

योग वेद, संस्कृतीसमवेत इतर बातम्या देणाऱ्या 'सुधर्मा' या वृत्तपत्राचा खप ४००० आहे तर 'सुधर्मा' ई-पेपरची रिडरशीप ही तब्बल एक लाखांहून जास्त आहे. हा पेपर इंग्लंड, जर्मनी, इस्त्रायलसह जगभरातील अनेक देशांमध्ये वाचला जातो.  

संपूर्ण भारतात १३ संस्कृत विद्यापीठे आहेत तर केवळ एकट्या कर्नाटक राज्यात १८ संस्कृत महाविद्यालये आहेत. अशा परिस्थितीतही सरकार संस्कृत वृत्तपत्राला मदत पुरवत नाही हे आश्चर्यच आहे.