सावधान ! जन-धन खात्यावर आयकर विभागाची नजर

आयकर विभागाला जनधन खात्यातील १.६४ कोटी रुपयाच्या अघोषित रक्कमची माहिती हाती लागली आहे. नोटबंदीनंतर जनधन खात्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा खात्यांची चौकशी आयकर विभागाने सुरु केली आहे.

Updated: Dec 3, 2016, 08:16 PM IST
सावधान ! जन-धन खात्यावर आयकर विभागाची नजर title=

नवी दिल्‍ली : आयकर विभागाला जनधन खात्यातील १.६४ कोटी रुपयाच्या अघोषित रक्कमची माहिती हाती लागली आहे. नोटबंदीनंतर जनधन खात्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा खात्यांची चौकशी आयकर विभागाने सुरु केली आहे.

कोलकाता, मिदनापूर, आरा (बिहार), कोच्ची आणि वाराणसीमध्ये अशा ठिकाणी अनेक बँक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार समोर आले आहेत. आयकर विभागाची देशभरातील असा अनेक जनधन खात्यांवर नजर आहे.

आयकर विभागासाठी रणनिती बनवणाऱ्या केंद्रीय प्रत्यक्ष आयकर बोर्डाने म्हटलं आहे की, ‘बिहारमध्ये अशा एक खात्यातून ४९ लाख रुपये जप्त केले गेले आहे. तर अशा खात्यामध्ये फक्त ५० हजार रुपये जमा करण्याची सवलत आहे. जवळपास १.६४ कोटी रुपयांची अघोषित पैसा जनधन खात्यामध्ये जमा केला गेला आहे. हा पैसा त्या लोकांच्या खात्यात आला आहे ज्यांचं उत्पन्न हे इतकं जास्त नाही आणि जे आयकर रिटर्न नाही भरत. जनधन खात्यात ही रक्कम कोलकाता, मिदनापूर, आरा, कोच्ची आणि वाराणसीमध्ये जप्त करण्यात आली आहे.

सीबीडीटीने म्हटलं आहे की, जप्त केलेल्या रक्कमेवर आयकर कायदा  1961 नुसार कर लावला जाईल. यानंतर इतर पाऊलं उचलले जातील. 23 नोव्हेंबरपर्यंत आलेल्या आकड्यानुसार जनधन खात्यांमध्ये २१ हजार कोटींहून अधिकची रक्कम जमा झाली आहे.