भारताला डिजीटल अर्थव्यवस्था बनवणे आवश्यक - डेविड कॅमरन

ब्रिटेनचे माजी पंतप्रधान डेविड कॅमरुन यांनी भारतात डिजिटल अर्थव्यवस्थेचं समर्थन केलं आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित एचटी समिट कार्यक्रमात बोलतांना त्यांनी म्हटलं की, यूरोपच्या बाहेर हा देश आहे जेथे मी विरोधी पक्षाचा नेता म्हणून दौरा करत आहे. मी जेव्हाही येथे येतो तेव्हा विकास आणि क्षमता पाहून स्तब्ध होऊन जातो.

Updated: Dec 3, 2016, 06:12 PM IST
भारताला डिजीटल अर्थव्यवस्था बनवणे आवश्यक - डेविड कॅमरन title=

नवी दिल्ली : ब्रिटेनचे माजी पंतप्रधान डेविड कॅमरुन यांनी भारतात डिजिटल अर्थव्यवस्थेचं समर्थन केलं आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित एचटी समिट कार्यक्रमात बोलतांना त्यांनी म्हटलं की, यूरोपच्या बाहेर हा देश आहे जेथे मी विरोधी पक्षाचा नेता म्हणून दौरा करत आहे. मी जेव्हाही येथे येतो तेव्हा विकास आणि क्षमता पाहून स्तब्ध होऊन जातो.

ब्रिटेनचे माजी पंतप्रधान डेविड कॅमरन म्हणतात की, ब्रेग्जिट ब्रिटेनसाठी डेड एन्ड नाही आहे. ब्रेग्जिट चुकीचं आहे. ब्रिटेनचा संपूर्ण देशांसोबतचा संबंध पुन्हा निर्धारित करावा लागेल. ब्रेग्जिट रेफरेंडम हा योग्य निर्णय होता. स्कॉटिश रेफरेंडम असावं असं मला नाही वाटतं. माझ्याकडे योजना आणि रणनिती होती. जर रेफरेंडम नसतं केलं गेलं तर हा स्कॉटिशच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी मदतगार असता. यासाठी मी प्रयत्न केला की युनाइटेड किंगडम एक राहो.

भारतासारख्या गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी सगळ्यात अडचणीची बाजू आहे पैशाची कमतरता. यामुळे सुधार आणण्याची गरज आहे. भ्रष्टाचार हा त्यामधला अडथळा आहे. तो थांबवण्यासाठी टॅक्सचं प्रमाण वाढवावं लागलं. देशात डिजिटल अर्थव्यवस्था बनवण्याची गरज आहे.