www.24taas.com, नवी दिल्ली
देशातील उद्योगक्षेत्र पुन्हा एकदा तेजीत येत असल्याचं दिसतय. ऑक्टोबर महिन्यात औद्योगिक विकास दराने नवी उडी घेतली. ऑक्टोबरमध्ये भारताचा विकास दर 8.2 टक्क्यांपर्यंत पोहचलाय.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हाच विकास दर वजा पाट टक्के इतका कमी होता. निर्मिती क्षेत्राचं या वाढीत मोठं योगदान आहे. दुसरीकडे महागाईचा दर चिंतेत टाकणारा आहे.
नोव्हेंबरमध्ये महागाई दर 10 टक्क्यांपर्यंत पोहचलाय. अन्नधान्य महागाईच्या दरानं 9.9 टक्के इतका दर गाठलाय. ऑक्टोबर महिन्यात हाच दर 9.45 टक्के इतका होता.