नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेची घौडदौड जोरात आहे. भारताने चीनला मागे टाकत ही घौडदौड सुरुच ठेवली असून विकासदर ७.५ टक्क्यांवर पोहोचलाय.
जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यांत विकासदराने ७.५ टक्क्यांवर झेप घेतली आहे. या अर्थव्यवस्थेचे मूल्य २.०२ खर्व डॉलर्स इतके आहे. जगातील दहावी आर्थिक सत्ता म्हणून भारताने स्थान मिळविले आहे.
सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिसने (केंद्रीय सांख्यिकी कार्यालय) ही आकडेवारी जाहीर केली आहे. नवीन मूल्यांकन पद्धत वापरून आकडेवारीची मांडणी गेल्यामुळे काही तज्ज्ञांकडून याबाबत शंका उपस्थितीत केली जात आहे. मात्र, भारताच्या आर्थिक विकासाचा वेग वाढला हे मात्र तज्ज्ञांनी मान्य केले आहे.
२०१४-१५मध्ये आर्थिक विकासदर ७.३ टक्क्यांवर होता. तो २०१३-१४ मध्ये ६.९ टक्के खाली आला. जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यांत विकासदर ७.५ टक्के होता. चीनचा विकासदर ७.४ टक्के असून भारताने पहिल्यादा चीनला मागे टाकले आहे.
विकासदराचे मूल्य १२५.४ लाख कोटी रुपये म्हणजे २.०२ खर्व डॉलर्स इतके झाले आहे. जगातील मोठी आर्थिक सत्ता असलेल्या देशांमध्ये भारतानने दहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर चीनची अर्थव्यवस्था १०.३ खर्व डॉलर्स म्हणजे भारतापेक्षा पाचपट मोठी आहे. अमेरिकाच जागतिक महासत्ता. १७.४ खर्व डॉलर्सची मजबूत अर्थव्यवस्था आहे.
भारतात दरडोई वार्षिक उत्पन्नात ८०,३८८ रुपयांवरून ८७,७४८ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. रिअल इस्टेट, आर्थिक क्षेत्राची वाढ ११.५ टक्क्यांवर गेली आहे. तर कृषी क्षेत्रातही चांगली वाढ झालेय. रिअल इस्टेटमध्ये गेल्या वर्षी ७.९ टक्के होती. या वर्षी आर्थिक क्षेत्रात शेअर बाजार, शेअर ब्रोकर्स, म्युचुअल आणि पेन्शन फंड, आर्थिक व्यवस्थापन करणार्या कंपन्या, सेबी आदींचा समावेश केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.