चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज

भारतावर कुरघोडी करण्यासाठी नेहमीच तयार असणाऱ्या चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारतही सज्ज झाला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेम प्लानमध्ये आता चिनी ड्रॅगन फसताना दिसत आहे.

Updated: Jul 14, 2016, 07:51 AM IST
चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज title=

नवी दिल्ली : भारतावर कुरघोडी करण्यासाठी नेहमीच तयार असणाऱ्या चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारतही सज्ज झाला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेम प्लानमध्ये आता चिनी ड्रॅगन फसताना दिसत आहे.

भारतावर कुरघोडी करण्यासाठी चीनने पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या बंदरापर्यंत आपले जाळे वाढविले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी आता भारताने इराणशी चाबहार बंदराचा करार केल्यामुळे पाकिस्तानवर दबदबा वाढला आहे.  भारताने आता मध्य आशियापर्यंत मजल मारली आहे. तसेच भारत-जपान सुरक्षासंबंधही वाढत  आहेत.

मलबार येथे झालेल्या युद्धकवायतींमध्ये जपान आणि अमेरिका या दोन्ही देशांनी सहभाग घेतला होता. भारत, अमेरिका आणि जपान यांच्या शक्तीप्रदर्शनामुळे चीन धास्तावला आहे.

पाहा या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट...