शॉकिंग, आपचे खासदार भगवंत मान संसदेत पिऊन आले दारू?

 आप खासदार भगवंत मान पुन्हा एकदा आपल्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे अडचणीत आले आहेत. 

Updated: Jul 13, 2016, 07:59 PM IST
शॉकिंग, आपचे खासदार भगवंत मान संसदेत पिऊन आले दारू?

चंडीगड :  आप खासदार भगवंत मान पुन्हा एकदा आपल्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे अडचणीत आले आहेत. 

काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आरोप लावला की आपचे खासदार संसदेत दारू पिऊन आले आहेत आणि त्यानंतर वादाला तोंड फुटले. 

भगवंत मान सारखे खासदार पंजाबची प्रतिमा मलीन करीत असल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले. 

भगवंत मान यांना दारूच्या व्यसनाबद्दल ही पहिल्यांदा चपराक नाही तर यापूर्वी असे घडले होते.  आम आदमी पक्षातून काढू टाकण्यात आलेल्या योगेंद्र यादव यांनीही भगवंत मान यांच्यावर संसदेत दारू पिऊन येत असल्याचा आरोप लावला होता. 

मला जुलै २०१४ मध्ये आपच्या मिटिंगवेळी खासदार भगवंत सिंग मान दारू पिऊन आले होते. ते माझ्या जवळ बसले होते त्यावेळी वास आल्याचे योगेंद्र यादव यांनी सांगितले होते.