भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, सरकारच्या आदेशाची प्रतिक्षा

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराने कंबर कसली

Updated: Sep 27, 2016, 11:16 AM IST
भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, सरकारच्या आदेशाची प्रतिक्षा title=

नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराने कंबर कसली आहे. भारतीय लष्कर हे पूर्णपणे सज्ज आहे. लष्कराने त्यांची जागा घेतली आहे. लश्कर हे पूर्णपणे तयार झालं आहे.

उरी हल्ल्यानंतर नव्या परिस्तिथीनुसार भारतीय लष्कर मिलिट्री ऑपरेशनल स्थितीत आली आहे. लाईन ऑफ कंट्रोलवर भारतीय सेना देखील वेगवेगळ्या स्तरावर खूपच कमी वेळात निकाल लावू शकते. हे रिडिप्लॉयमेंट फोर्स मोबिलायजेशन नाही आहे. भारताने फोर्स मोबिलाइजेशन 1971 मध्ये केलं होतं.

विशेषकरुन पीओकेमध्ये 17-18 दहशतवादी कॅम्प आहेत ज्यांना त्यांची जागा बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लष्कराच्या कारवाईनुसार हे चांगलं आहे. आधी 38 कॅम्प पीओकेमध्ये सक्रिय होते आणि वेगवेगळ्या भागात होते. पण हे कॅम्प आता एकाच ठिकाणी आल्याने भारतीय लष्कराला याचा फायदा होणार आहे.

४ पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी सेक्टरमध्ये लष्कराच्या एका यूनिटवर हल्ला केला होता. ज्यामध्ये १८ जवान शहीद झाले होते. यानंतर देखील घुसखोरीचा प्रयत्न झाला आणि भारतीय लष्कराने १० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले पण याबाबत अजून कोणतीही माहिती अजून जाहीर केलेली नाही. भारतीय सेना पूर्णपणे तयार आहे. फक्त सरकारच्या इशाऱ्याची वाट पाहत आहे. पंतप्रधान मोदी यांनी वॉररुममध्ये लश्कराची तयारी, योजना आणि अॅक्शन यावर माहिती घेतली. अचानक नवे आव्हान आल्यास त्यापासून निपटण्यासाठी देखील काय तयारी आहे याची देखील पंतप्रधानांनी माहिती घेतली.