रेल्वेच्या तिकीटांमध्ये बदल

रेल्वेनं आपल्या तिकीटांच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना तिकीटावर स्वत: बाबतची माहिती द्यावी लागणार आहे. 

Updated: Mar 7, 2016, 05:08 PM IST
रेल्वेच्या तिकीटांमध्ये बदल title=

मुंबई: रेल्वेनं आपल्या तिकीटांच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना तिकीटावर स्वत: बाबतची माहिती द्यावी लागणार आहे. प्रवाशांना तिकीटाच्या मागे आपलं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहिणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 

यासाठी रेल्वेनं तिकीटाच्या मागे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरचा कॉलम बनवला आहे. संकटाच्यावेळी जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ओळख पटण्यासाठी तिकीटांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. 

रिझर्व्हेशन केलेल्या प्रवाशांबाबतची माहिती आधीपासूनच रेल्वेकडे असते, पण अनारक्षित तिकीटानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी हा बदल करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.