मुंबई : 'आयएनएस कोचीन' ही कोलकता वर्गातील दूसरी विनाशिका ( destroyer ) - युद्धनौका आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत नौदलात दाखल होतेय.
माझगांव डॉकयार्डमध्ये या युद्धनौकेची बांधणी करण्यात आलीय. या युद्धनौकेचं एकूण वजन आहे तब्बल 7,500 टन आहे. तर लांबी आहे 164 मीटर...
या युद्धनौकचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, शत्रुपक्षाच्या रडारवर चटकन शोधता येणार नाही अशी स्टेल्थ पद्धतीची युद्धनौकची रचना आणि आकार आहे. तसंच समुद्रातील पाणबुड्यांच्या हालचाली चटकन समजू शकतील असे शक्तिशाली सोनार युद्धनौकेमध्ये आहे. समुद्रच्या पृष्ठभागावर आणि हवेमध्ये शत्रुपक्षाच्या युद्धनौका, विमाने आणि क्षेपणास्त्रे यांच्या हालचाली काही किलोमीटर आधीच समजू शकतील अशी शक्तिशाली रडार यंत्रणा युद्धनौकेवर आहे.
युद्धनौकेवरून 280 किमीपर्यन्त वेगवान मारा करणारी ब्रह्मोज क्षेपणास्त्रे आणि जमिनिवरून दूरवर हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे युद्धनौकेवर आहेत. तर वेग प्रति तास 30 नॉटीकल मैल असा आहे. खास वैशिष्टय़ म्हणजे यावर एलबिट सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाणबुडी विरोधी 4 टॉरपेडो टय़ूब्ज लावण्यात आल्या आहेत.
माझगाव डॉक येथे 25 ऑक्टोबर 2005 साली आयएनएस कोची या विनाशिकेच्या बांधणीस सुरुवात झाली होती. तब्बल चार वर्ष्नांनी आयएनएस कोचीचा आराखडा आखून 18 सप्टेंबर 2009 साली तयार झाली होती. आयएनएस कोलकातावर ज्या अत्याधुनिक यंत्रणा नाहीत त्या यंत्रणांचा समावेश आयएनएस कोचीवर करण्यात आला आहे. आतापर्यंत नौदल हे युद्धनौका, पाणबुडी, विनाशिका, अत्याधुनिक टँक बोटसाठी रशियावर अवलंबून होते. मात्र, गेल्या काही वर्षापासून नौदलाच्या सर्व यंत्रणांची बांधणी देशातच करण्यास सुरुवात झाली आहे.
दोन हेलिकॉप्टर सामावून घेण्याची क्षमता असलेल्या या युद्धनौकेच्या समावेशाने भारतीय नौदलाच्या ताकदीत मोठी भर पडणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.