कोलकाता : देशात सहिष्णुता आणि मतांतर मान्य करणे यांचा ऱ्हास सुरु झाला आहे काय याबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. सहिष्णुतेच्या गुणामुळेच भारतीय संस्कृती ५ हजार वर्षे टिकली आहे. तिने नेहमीच मतांतरे आणि मतभेद मान्य केलेत.
‘नयाप्रजानामा’ या साप्ताहिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मुखर्जी म्हणाले. देशात सहिष्णुता आणि मतांतर मान्य करणे यांचा ऱ्हास सुरू झाला आहे काय? सहिष्णुतेच्या गुणामुळेच भारतीय संस्कृती ५ हजार वर्षे टिकली आहे. तिने नेहमीच मतांतरे व मतभेद मान्य केले आहेत. किती तरी भाषा, १६०० बोलीभाषा आणि ७ धर्म भारतात सहकार्याने नांदतात. आपली घटनाही या सर्व मतभिन्नतांना सामावून घेते, असे राष्ट्रपतींनी आवर्जून सांगितले.
देशात असहिष्णुता दर्शवणाऱ्या घटना वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, सहिष्णुता आणि मतभेद मान्य करणे यांना उतरती कळा लागली आहे की काय, अशी चिंता राष्ट्रपती मुखर्जी यांनी व्यक्त केली. मात्र मुंबईत शिवसेनेच्या दबावामुळे गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द होणे, सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक आणि भारत पाकिस्तान क्रिकेट मंडळाची बोलणी रद्द होणे या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी समाजात मतांतरे मान्य करण्याची गरज व्यक्त केलीये.
Is tolerance and acceptance of dissent on the wane? #PresidentMukherjee while addressing a gathering in Birbhum, West Bengal today
— President of India (@RashtrapatiBhvn) October 19, 2015
Is tolerance and acceptance of dissent on the wane? #PresidentMukherjee while addressing a gathering in Birbhum, West Bengal today
— President of India (@RashtrapatiBhvn) October 19, 2015
Indian civilization has survived for 5000 years because of its tolerance #PresidentMukherjee
— President of India (@RashtrapatiBhvn) October 19, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.