सरकारी डाटा चोरण्यासाठी ISISच्या भारतीय तरुणांना मालामाल ऑफर्स

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट' अर्थात ISIS भारतात आपले पंख पसरवू पाहात आहे.

Updated: Jan 26, 2016, 04:26 PM IST
सरकारी डाटा चोरण्यासाठी ISISच्या भारतीय तरुणांना मालामाल ऑफर्स

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट' अर्थात ISIS भारतात आपले पंख पसरवू पाहात आहे. यासाठी त्यांनी आता भारतीय तरुणांनाच आकर्षित करायला सुरुवात केली आहे. 

सरकारचा संवेदनशील डाटा चोरण्यासाठी आता ISIS ने भारतीय तरुण हॅकर्सना भरपूर पगाराच्या नोकऱ्या देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ते तरुणांना प्रति महिना दहा हजार डॉलर्स (६,७०,००० रुपये) इतक्या पगाराची ऑफर देत आहेत. 

डेली मेलच्या एका अहवालानुसार या संघटना ट्विटर आणि फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कींग साइट्सवर ISISचा भाग होऊ इच्छिणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत आणि त्यांचा एक डेटाबेस तयार करत आहेत. 

सुरक्षा यंत्रणांसोबत काम करणाऱ्या काही तज्ज्ञांच्या मतानुसार अनेक हॅकर्स तरुण आत्ताच या संघटनांच्या संपर्कात असून गेले सहा महिने संवेदनशील सरकारी डेटा चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ISISने आत्तापर्यंत तब्बल ३०,००० तरुणांना संपर्क केला आहे. आपले नेटवर्क वाढवण्यासाठी त्यांना भारत सरकारच्या अधिकृत आकडेवारीची गरज पडणार आहे. म्हणूनच हा खटाटोप सुरू आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात फसवण्यात या संघटनेला यश आले आहे. म्हणूनच सरकारतर्फे आता ठिकठिकाणी छापेमारी करून ISISच्या संपर्कात असलेल्या लोकांना अटक करण्यात येत आहे. महाराष्ट्र एटीएसने गेल्याच आठवड्यात ISIS संबंधीत ९४ वेबसाईट्स बंद केल्या आहेत.