पासपोर्टसाठीची पोलिस पडताळणी आता पासपोर्ट मिळाल्यानंतर

नवी दिल्ली : पासपोर्ट बनवून घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Updated: Jan 26, 2016, 02:53 PM IST
पासपोर्टसाठीची पोलिस पडताळणी आता पासपोर्ट मिळाल्यानंतर  title=

नवी दिल्ली : पासपोर्ट बनवून घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार आता पासपोर्ट बनवून घेताना होणारी पोलिस पडताळणी पासपोर्ट तयार झाल्यावर होणार आहे. 

असे असले तरी पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रं जमा करणे मात्र बंधनकारक असणार आहे. मगच पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू केली जाईल. 

सुषमा स्वराज यांनी केलेल्या एका ट्वीटच्या मते पासपोर्ट काढण्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि पॅन कार्ड यांच्या प्रती जोडल्यास पासपोर्ट मिळू शकतो. याचसोबत तुमच्यावर कोणत्याही पोलिस स्थानकात कसलाही गुन्हा दाखल नसल्याचे एक प्रतिज्ञापत्रही जोडावे लागेल. 

पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया सुकर करण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.