www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
डॉलरच्या तुलनेत रुपया कमी झाल्याचा परिणाम आता कम्प्युटर आणि लॅपटॉपच्या किंमतींवरदेखील होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या महागाईमुळे आयटीसंबंधी उत्पादनांच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
‘मॅट’ या आयटी हार्डवेअर उद्योग समितीच्या मते, भारतात आयटी उद्योग हा मोठ्या स्वरुपात आयातीवर आधारीत आहे. कंपन्यांना कच्च्या मालाच्या आयातीसाठी ‘रुपया’मध्ये किंमत द्यावी लागते. रुपया कमजोर झाल्यानं त्यांच्या आयातीच्या किंमतीवर मोठा परिणाम होतोय.
‘मॅट’च्या अधिकाऱ्यांच्या मते, भारतात आयटी उद्योग ८५-९० टक्के उद्योग आयातीवर अवलंबून आहे. गेल्या एका महिन्यात रुपयाच्या किंमतीत १० टक्क्यांपेक्षा जास्त घसरलीय.
जून महिन्यात लेनेवो, एचपी तसचं एचसीएलसहीत अनेक प्रमुख कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अर्थातच याचा भूर्दंड ग्राहकांनाही सोसावा लागेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.