जयपाल रेड्डींना हटविण्यात अंबानींचा दबाव

केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला फेरबदल वादात सापडलाय.. निमित्त आहे जयपाल रेड्डी यांच्या खातेबदलाचं.. मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळेच त्यांची पेट्रोलियम मंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे.. मुळ विरोधकांनाही आयतं कोलीत हाती लागलय तर नाराजीचे वृत्त चुकीचं असल्याचं रेड्डींनी स्पष्ट केलय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 29, 2012, 10:23 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली

केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला फेरबदल वादात सापडलाय.. निमित्त आहे जयपाल रेड्डी यांच्या खातेबदलाचं.. मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळेच त्यांची पेट्रोलियम मंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे.. मुळ विरोधकांनाही आयतं कोलीत हाती लागलय तर नाराजीचे वृत्त चुकीचं असल्याचं रेड्डींनी स्पष्ट केलय.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डींकडं असलेलं पेट्रोलियम मंत्रालय काढून त्यांच्याकडं तुलनेनं कमी महत्वाच्या असलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचं खातं सोपवण्यात आलं. तर वीरप्पा मोईली यांची वर्णी यापदी लागलीय. मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळेच रेड्डींची उचलबांगडी झाल्याची चर्चा यानिमित्तानं सुरु झालीय.
प्रामाणिक इमेज असलेल्या जयपाल रेड्डींची रिलायन्सच्या इशा-यावरुन उचलबांगडी केल्याची टीका अरविंद केजरीवालांनी केलीये. प्रामाणिक इमेजच्या जयपाल रेड्डींचे डिमोशन तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या खुर्शीदांना प्रमोशन दिल्याचा टोलाही केजरीवालांनी लगावलाय.
या खातेबदालवर जयपाल रेड्डीही नाराज असल्याची चर्चा होती.. विरप्पा मोईलींनी पेट्रोलियम मंत्रालयाचा पदभार स्वीकारला यावेळी जयपाल रेड्डी पदभार देण्यासाठी उपस्थित नव्हते. त्यामुळं रेड्डी नाराज असल्याच्या चर्चांना आणखीनच उधाण आल होतं.. मात्र त्यानंतर नव्या खात्याचा पदभार स्वीकारताना नाराजीचे वृत्त चुकीचं असल्याचं जयपाल रेड्डींनी स्पष्ट केलं.
गोदावरी खो-यातील वायू उत्खननावरुन जयपाल रेड्डी यांनी मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीबाबत कठोर भूमिका घेतती होती. या वायू उत्खननाबाबत रेड्डींनी नियमांवर बोटं ठेवलं होतं, तसचं वायू उत्खननावरुन अनेक सवालही उपस्थित केले होते. वायूच्या दराबाबतही कोणतीही तडजोड करण्यास त्यांनी नकार दिला होता.
रिलायन्ससोबत घेतलेला हा पंगाच रेड्डींना महागात पडल्याचं सांगण्यात येतय. नाराजीचे वृत्त फेटाळून रेड्डींनी हा वाद थांबवला असला, तरी यानिमित्तानं मंत्रिमडंळ फेरबदल मात्र वादात सापडल्याचं दिसून आलय.