हरीश धनदेवने वाळवंटातही केली शेती, कमावले कोट्यवधी

भारत हा कृषीप्रधान देश असूनही कृषीसंकटांची इथे कमतरता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरलेल्याच. पण या संकटांवर मात करून शेती हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारता येऊ शकतो हे दाखवून दिलंय जैसलमरच्या एका तरूणाने.

Updated: Jul 12, 2016, 06:44 PM IST
हरीश धनदेवने वाळवंटातही केली शेती, कमावले कोट्यवधी title=

जैसलमेर : भारत हा कृषीप्रधान देश असूनही कृषीसंकटांची इथे कमतरता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरलेल्याच. पण या संकटांवर मात करून शेती हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारता येऊ शकतो हे दाखवून दिलंय जैसलमरच्या एका तरूणाने.
 

राजस्थानच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हरीश धनदेवने दिल्लीतल्या एका कृषीप्रदर्शनाला भेट दिली आणि थेट पूर्णवेळ शेतकरी होण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या 120 एकर जमिनीत कोरफड आणि अन्य पिकांची शेती सुरू केली. या शेतीतून त्याला दीड ते दोन कोटी रूपयांचं उत्पन्न मिळू लागलंय.

हरीशने स्वतःची कंपनीही सुरू केली आहे. कोरफडचा पुरवठा पतंजली फूड प्रोडक्ट्सला ज्यूस बनवण्यासाठी केला जातो.  हरीशच्या कोरफडीला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगली मागणी आहे.

हरीश जैसलमेर महापालिकेत ज्यूनिअर इंजिनिअर पदावर काम करत होता. ती नोकरी सोडून शेतकरी बनणाऱ्या हरीशची कहाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल. कारण डॉक्टरचा मुलगा जसा डॉक्टर बनतो तसा शेतकऱ्याचा मुलगाही शेतकरी बनू शकतो हे हरिशने सिद्ध केलंय.