काश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पुन्हा चकमक, एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी सुरुच आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा इथं गोळीबाराचा आवाज ऐकू आला. 

Updated: Sep 22, 2016, 12:22 PM IST
काश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पुन्हा चकमक, एक दहशतवादी ठार  title=

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी सुरुच आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा इथं गोळीबाराचा आवाज ऐकू आला. 

काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. यात एक दहशतवाद्याला ठार करण्यात भारतीय सेनेला यश आलंय.

नेमके किती दहशतवादी या भागात लपून, दबा धरून बसलेत याचा मात्र अजून थांगपत्ता लागलेला नाही. बांदीपुरा भागात आणखी २ - ४ दहशतवादी असण्याची शंका आहे. 

पोलिसांनी दहशतवादी लपून बसल्याची बातमी मिळताच आज सकाळा अरागाम चिट्टी बांदी गावाला चारही बाजुंनी घेरलं... सेनेचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

मंगळवारीही उत्तर काश्मीर भागात बारामुल्ला-कुपवाडा जिल्ह्यातील सुरक्षा दल आणि घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये चकमक घडून आली. यात १० दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं ठार केलं होतं... तर एक जवानही शहीद झालाय. त्यानंतर आज पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न झालाय.