बंगळुरु : देशातील सर्वात शक्तीशाली महिलांपैकी एक जयललिता यांनी लगातार दुसऱ्यांदा तमिलनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवा विक्रम केला. जयललिता ६ व्यांदा मुख्यमंत्री झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी ५ मोठ्या घोषणा करुन टाकल्या.
१. सरकारी शाळेमध्ये आता विद्यार्थ्यांना मोफत नाश्ता मिळणार
२. राज्यातील दारूची ५०० सरकारी दुकानं बंद करण्याचे आदेश. इतर दारुची दुकानांवर ही सुरु ठेवण्याबाबत मर्यादा. दुपारी १२ ते रात्री १० पर्यंतच राहमार सुरु
३. विवाहामध्ये मंगलसूत्रासाठी ८ ग्रॅम सोनं देण्याची घोषणा
४. शेतकऱ्यांना कर्ज माफी
५, गिरणींना ७५० यूनिट मोफत वीज
जयललितांनी मागच्या कार्यकाळात देखील स्वस्तात भोजन देणारे अम्मा कँटीन, अम्मा पाणी, अम्मा फार्मेसी, अम्मा सीमेंट अशा अनेक योजना आणल्या होत्या. ज्याचा त्यांना अधिक फायदा झाला आहे.