पुत्रप्राप्तीच्या औषध विक्रीत अडकले बाबा रामदेव

जेडीयूचे खासदार के.सी.त्यागी यांनी बाबा रामदेव यांच्या पूत्र जन्मासाठीच्या औषधाचा मुद्दा आज संसदेत उपस्थीत केला. के.सी.त्यागी यांनी त्या औषधाची पाकीटं देखील संसदेत दाखवली. औषधांची पाकीटं त्यांनी स्वत: विकत आणली होती. आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Updated: Apr 30, 2015, 02:52 PM IST
पुत्रप्राप्तीच्या औषध विक्रीत अडकले बाबा रामदेव title=

नवी दिल्ली: जेडीयूचे खासदार के.सी.त्यागी यांच्याकडून बाबा रामदेव यांच्या मुलगा प्राप्तीसाठी औषधाचा मुद्दा आज संसदेत उपस्थित केला.

के.सी.त्यागी यांनी त्या औषधाची पाकिटं देखील संसदेत दाखवली. औषधांची पाकिटं त्यांनी स्वत: विकत आणली होती. आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

त्यागी यांनी सांगितले की, एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणातून 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या मोहिमेची सुरूवात करत आहेत. दुसरीकडे रामदेव बाबा  मुलगाच होण्यासाठीची औषधं हरियाणात विकत आहेत. त्यागी यांनी या प्रकरणी विलंब न करता कारवाईची मागणी केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.