चंदिगढ : पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी. पंजाबमध्ये चालत्या खासगी बसमध्ये अतिप्रसंग कऱण्याचा प्रयत्न झाला. ही बस मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मालकीच्या ट्रव्हल्स कंपनीची आहे. अतिप्रसंगामुळे मुलगी आणि आईने बसमधून उड्या मारल्या. यात मुलीचा मृत्यू झाला.
बसमधील काही टार्गट मुलांनी छेडछाड काढली. त्यानंतर बस वाहकानेही प्रयत्न केला. त्यामुळे एका १३ वर्षीय मुलीला आणि तिच्या आईला चालत्या बसमधून उड्या माराव्या लागल्या. यात मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आईला गंभीर दुखापत झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत.
बस कंडक्टरच्या हेल्पर या दोघींचा विनयभंग आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्या दोघींनी बस थांबवण्यासाठी ड्रायव्हरला सांगितलं मात्र ड्रायव्हरनं बस आणखीनच वेगानं चालववी त्यामुळे नाईलाजस्तव या मायलेकीला चालत्या बसमधून उडी मारावी लागली. पोलिसांनी उद्याप कोणाला अटक केलेली नाही.
पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.