इटानगर : काँग्रेसचे बंडखोर नेते कालिखो पूल यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कालिखो पूल हे अरुणाचल प्रदेशचे ९ वे मुख्यमंत्री ठरले.
राज्यपाल के. पी. राजखोवा यांनी कालिखो यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपचे अकरा आणि दोन अपक्ष आमदारांच्या पाठबळावर पूल यांनी सरकार स्थापन केलं. यातील बहुतेकांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात नव्याने निवडणूक घेण्यासाठी नव्या सरकारकडून विधानसभा बरखास्त होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. पूल यांनी याआधी राज्याचे अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्री म्हणून काम केलं आहे.