नवी दिल्ली: स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकारनं देशातली सगळ्यात स्वच्छ अशा 10 शहरांची यादी जाहीर केली आहे.
स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणासाठी देशातल्या 73 शहरांचा समावेश करण्यात आला होता. स्वच्छ सर्वेक्षण 2016 च्या अंतर्गत या शहरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. या 73 शहरांनी टॉयलेट आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी काय पावलं उचलली हे या सर्वेक्षणात पाहण्यात आलं.
या 73 शहरांमधल्या शेवटच्या दहा शहरांमध्ये कल्याण डोंबिवलीचा समावेश आहे. या यादीमध्ये कल्याण-डोंबिवलीला 64 नंबरचं स्थान देण्यात आलं आहे. म्हणजेच कल्याण डोंबिवली हे अस्वच्छ शहरांमध्ये 10 नंबरवर आहे. तर झारखंड मधलं धनाबाद शहर हे सगळ्यात अस्वच्छ शहर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ असलेलं वाराणसी शहरही अस्वच्छ शहरांच्या यादीत आहे.
64 कल्याण डोंबिवली (महाराष्ट्र)
65 वाराणसी (उत्तर प्रदेश)
66 जमशेदपूर (झारखंड)
67 गाझियाबाद (उत्तर प्रदेश)
68 रायपूर (छत्तीसगड)
69 मीरत (उत्तर प्रदेश)
70 पाटणा (बिहार)
71 इटानगर (अरुणाचल प्रदेश)
72 असानसोल (पश्चिम बंगाल)
73 धनाबाद (झारखंड)