हरदा : मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमानजिक मध्य प्रदेशातल्या हरदा इथे दोन एक्स्प्रेस गाड्या रुळावरुन घसरल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत २९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर सुमारे तीनशे जणांना वाचवण्यात आलं आहे.
या अपघातात मालेगावातील एका महिलेचा मृत्यू झाला असून वाराणसीला यात्रेसाठी जाणाऱ्या बागलाण आणि मालेगाव भागातील १५० जण मध्यप्रदेशात अडकले असल्याचे माहिती धुळ्याचे शहराचे खासदार सुभाष भांबरे यांनी दिली.
या अपघातात अजूनही मालेगावचे तीन जण बेपत्ता असल्याचेही माहिती समोर येत आहे.
अपघातानंतर मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बदलण्यात आहे.
व्हाया भुसावळ-नागपूर-इटारसी
१२३२२ सीएसटी-हावडा मेल व्हाया अलाहाबाद
१२१४१ एलटीटी- राजेंद्रनगर एक्स्प्रेस
११०९३ सीएसटी - वाराणसी महानगरी एक्स्प्रेस
व्हाया इटारसी-नागपूर-भुसावळ
११०७८ जम्मू तावी-पुणे झेलम एक्स्प्रेस
१२१४२ राजेंद्रनगर -एलटीटी एक्स्प्रेस
व्हाया भुसावळ-सुरत-बैरागड-निशातपुरा
१२१४७ कोल्हापूर -हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस व्हाया भुसावळ-सुरत
११०७७ पुणे -जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस
१२१३७ सीएसटी-फिरोझपूर पंजाब मेल
११०१५ एलटीटी - गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस
११०५७ सीएसटी-अमृतसर एक्स्प्रेस व्हाया जळगाव, भोपाळ
१२६१७ एर्नाकुलम - हजरत निझामुद्दी मंगला एक्स्प्रेस
व्हाया निशातपुरा-बैरागड-वसई रोड
१२७८० हजरत निझामुद्दीन -वास्को एक्स्प्रेस
व्हाया भोपाळ, नादियाड, भुसावळ
१२५९७ गोरखपूर-सीएसटी एक्स्प्रेस
व्हाया निशातपुरा-बैरागड-जळगाव
१२७१६ अमृतसर-हजुर साहिब नांदेड एक्स्प्रेस
शॉर्ट टर्मिनेटेड
५११५७ भुसावळ-इटारसी पॅसेंजर खंडाळाजवळ
व्हाया भुसावळ -नागपूर-इतारसी
११०१५ एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस
११०५७ सीएसटी-अमृतसर एक्स्प्रेस
१२३२२ सीएसटी-हावडा मेल व्हाया अलाहाबाद
व्हाया इतारसी-नागपूर-भुसावळ
१२३२१ हावडा -सीएसटी मेल व्हाया अलाहाबाद
पश्चिम रेल्वेचे हेल्पलाईन नंबर
इटारसी - ०७५७२ २४१९२०
बिना - ०७५८० २२२०५२
हरदा - ०९७५२४६००८८
भोपाळ - ०७५५ ४००१६०९
मध्य रेल्वे हेल्पलाईन नंबर:
सीएसटी०२२-२२६९४०४०
एलटीटी०२२-२५२८०००५
ठाणे ०२२-२५३३४८४०
कल्याण ०२५१-२३११४९९
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.