कन्हैय्या कुमारने घेतली राहुल गांधींची भेट

जेएनयु विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारनं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतलीय. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झालीय.

Updated: Mar 22, 2016, 01:56 PM IST
कन्हैय्या कुमारने घेतली राहुल गांधींची भेट  title=

नवी दिल्ली : जेएनयु विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारनं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतलीय. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झालीय.

कन्हैय्यासह विद्यार्थी संघटनेचे पाच जण यावेळी उपस्थित होते. या भेटीचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र कन्हैय्या कुमारला सोबत घेऊन भाजपला टार्गेट करण्याची काँग्रेसची रणनीती असल्याचं बोललं जातंय.

देशद्रोही घोषणाप्रकरणी कन्हैय्या कुमारला अटक झाल्यानंतर जेएनयुमध्ये झालेल्या बैठकीला उपस्थित राहत राहुल गांधींनी त्याला पाठिंबा दर्शवला होता. सध्या या प्रकरणी कन्हैय्याची जामीनावर सुटका झालीय.