कन्हैया कुमारच्या जामीनावर २९ फेब्रुवारीला सुनावणी

कन्हैया कुमारच्या जामीनावर २९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. उमर खालीद शरण आल्यामुळं कन्हैयाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात केलीय. 

Updated: Feb 24, 2016, 04:07 PM IST
कन्हैया कुमारच्या जामीनावर २९ फेब्रुवारीला सुनावणी  title=

नवी दिल्ली : कन्हैया कुमारच्या जामीनावर २९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. उमर खालीद शरण आल्यामुळं कन्हैयाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात केलीय. 

देशविरोधी घोषणाबाजीसंदर्भात कन्हैय्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी केवळ व्हिडिओ फूटेजच नव्हे तर प्रत्यक्षदर्शीही पुरावे म्हणून असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

कन्हैया सध्या तिहार जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. याच प्रकरणात एकूण ६ आरोपी आहेत. त्यापैकी उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांनी काल रात्री उशिरा पोलिसांसमोर शरणगती पत्करली. त्यामुळे दोघांसोबत समोरासमोर चौकशी करण्यासाठी कन्हैयाला पुन्हा एकदा पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केलीय. 

मात्र यासाठी पोलिसांना पटियाला हाऊस कोर्टात जावं लागणार आहे. दिल्ली पोलिस उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य या दोघांना दुपारी पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार आहेत.