बंगळुरु : नोटबंदीनंतर अनेकांनी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बँक खात्यामध्ये जमा केल्या. अशा खात्यांवर आयकर विभागाची नजर आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात 30 डिसेंबर आधी पैसा जमा केला.
आयकर विभागाच्या रडारवर कर्नाटक आणि गोवामधील 7000 बँक खाते आहेत ज्यामध्ये नोटबंदी दरम्यान 80 लाख किंवा त्यापेक्षा अधिक पैसा जमा केला गेला आहे. या खात्यांमध्ये जनधन खात्यांचा ही समावेश आहे. ज्या जनधन खात्यांमध्ये नोटबंदी आधी कमी रक्कम जमा होती पण नंतर मोठी रक्कम जमा केली गेली. आयकर विभागाने अशा खात्यांची माहिती मागवली आहे.