www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सुरूवात झाली. पहिल्या तीन तासात १५ ते २० टक्के मतदान झाल्याचे नोंद करण्यात आलेय.
मतदानाला उत्साहात सुरूवात झाल्याने मतदान चांगले होण्याची शक्यता आहे. तुमतूक येथील सिद्धगंगा मठातील १०६ वर्षीय संत शिवकुमार स्वामी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून कर्नाटकात मतदानास सुरुवात झालीय. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जवळपास दीड लाख सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेत.. तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर जादा सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय.
एकूण २२3 जागांसाठी हे मतदान होत असून ३००० उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतदारराजा व्होटिंग मशिनमध्ये बंदीस्त करणार आहे. कर्नाटक जनता पार्टीचे बी.एस.येडियुरप्पा यांनी आज. सकाळी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत येडियुराप्पांचा पक्ष पहिल्यांदाच मतदारांच्या सामोरे जाणार आहे. त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी ही निवडणूक महत्तवाची आहे. दरम्यान ८ मे रोजी मतमोजणी होणार आहे.