जम्मू : काश्मीर आणि जम्मूमध्ये मुसळधार कोसळलेल्या पावसाने पूर परिस्थितीने हाहाकार उडवला. पुरात अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात लष्कराने यश मिळविले. पुरात अडकलेल्यापैंकी 1.42 लाख नागरिकांचे जीव वाचविण्यात यश आले.
भयानक पुरातून आतापर्यंत लष्कर आणि एनडीआरएफच्या जवानांनी लोखो नागरिकांचा जीव वाचविला आहे. अद्याप लष्कराचे बचावकार्य सुरूच आहे. अनके काश्मीर नागरिकांनी लष्कराचे आभार व्यक्त करताना ते आमच्यासाठी देव ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
काश्मीर खोऱ्यात पुराचे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. मात्र, येथ दुर्गंधी पसरली आहे. तसेच पिण्याच्या प्रश्न गंभीर बनला असून, देशभरातून पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा येथे नेण्यात येत आहे. सध्या 1.2 लाख शुद्ध केलेल्या पाण्याच्या बाटल्या नागरिकांना पुरविण्यात आल्यात. जवळपास 30 हजार जवान काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या बचावासाठी कार्यरत आहेत.
काश्मीरमध्ये महारोगाची शक्यता असल्याने पावले उचलण्यात येत असून, लष्कराने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरवात केली आहे. सर्व सोईंनी सुसज्ज अशी दोन रुग्णालये श्रीनगरमध्ये सुरू करण्यात आली आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, बडोदा, अमृतसर या शहरांतून ब्लँकेट, तंबू पुरविण्यात येत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.