पाकिस्तानला ललकारणाऱ्या भारतीय जवानाला जिवे मारण्याची धमकी

 उरी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एका रात्रीतून व्हायरल झालेली कविता 'कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नही होगा'  गाणारा हेड कॉन्स्टेबल मनोज ठाकूरला जिवे मारण्याची धमक्या मिळत आहेत. 

Updated: Oct 10, 2016, 06:34 PM IST
पाकिस्तानला ललकारणाऱ्या भारतीय जवानाला जिवे मारण्याची धमकी  title=

नवी दिल्ली :  उरी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एका रात्रीतून व्हायरल झालेली कविता 'कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नही होगा'  गाणारा हेड कॉन्स्टेबल मनोज ठाकूरला जिवे मारण्याची धमक्या मिळत आहेत. 

ही कविता गायल्यानंतर प्रसिद्ध झालेले मनोज ठाकूर यांनी सांगितले की फेसबूक अकाउंटवर त्यांना मारण्याची धमक्या मिळत आहेत. मनोजने आपल्या २ मिनिट १० सेकंदाच्या कवितेत भारतातील प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण केली होती. 

या व्हिडिओला लाखो लोकांनी शेअर केले होते. पण आता काही पाकिस्तानी नागरिकांनी त्यांना जिवे मारण्याची फेसबूकवर धमकी दिली आहे. 

हिमाचल प्रदेशचे कॉन्स्टेबल मनोज ठाकूर यांनी आपल्या आलेल्या धमक्या फेसबूकवर शेअर केल्या आहेत. फरमान खान आणि बिलाल अहमद नावाच्या फेसबूक आयडीवरून भारत विरोधी गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. त्यावर मनोज यांना मारण्याची धमकी दिली आहे. 

मनोज यांनी फेसबूकवर आपल्या अंदाजात उत्तर दिले आहे. ते म्हणतात,   ये क्या मुझे मारेंगे, इन्हें मैं वो धूल चटाऊंगा कि रखेंगे याद रखेंगे

आता तुम्ही परत पाहा कोणती कविता म्हटली होती मनोज ठाकूर यांनी...