www.24taas.com, नवी दिल्ली
आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधताना चक्क नरेंद्र मोदींवरच आरोपांची तोफ डागली आहे.दोन कंपन्याकडून तंत्रविषय मदत घेण्याच्या बहाण्याने त्यांनी खासगी कंपन्यांना सरकारी कंपन्यांच्या उत्पन्नातील 20 अब्ज रुपयांची भागीदारी दिली आसल्याचा केजरीवाल यांनी आरोप केला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अदानी कंपनीला अत्यंतकमी दरात जमीन देऊन चढ्या भावाने त्यांच्याकडून वीज घेतल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. या संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यानंतर केजरीवालांनी थेट नरेंद्र मोदींना लक्ष्य केल्यामुळे गुजरात निवडणुकीच्या तोंडावर ममोदींसाठी अडचण ठरण्याची शक्यता आहे.
मोदींनी अदानी समुहाकडून जास्त दराने वीज खरेदी केली असून 2.25 रुपये प्रति य़ुनिट दराने वीज खरेदी करण्याचा प्रस्ताव असताना त्यांनी 5.45 रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी केली आहे. तसंच 14, 306 एकर जमीन मोदींनी स्वस्तात दिल्याचंही केजरीवाल म्हणाले आहेत.