दिल्लीत ख्रिश्‍चन शाळेवर हल्ला, केजरीवाल यांनी केली निंदा

दिल्लीमधील वसंत विहार येथील होली चाईल्ड ऑक्‍सीलियम या ख्रिश्‍चन शाळेवर करण्यात आलेल्या हल्ल्याची नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निंदा केली आहे. हा भ्याड हल्ला असल्याचे त्यांनी म्हटलेय.

Updated: Feb 13, 2015, 07:41 PM IST
दिल्लीत ख्रिश्‍चन शाळेवर हल्ला, केजरीवाल यांनी केली निंदा title=
छाया - डीएनए

नवी दिल्ली : दिल्लीमधील वसंत विहार येथील होली चाईल्ड ऑक्‍सीलियम या ख्रिश्‍चन शाळेवर करण्यात आलेल्या हल्ल्याची नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निंदा केली आहे. हा भ्याड हल्ला असल्याचे त्यांनी म्हटलेय.

शाळेवर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आज शुक्रवारी सूत्रांनी दिले. या हल्ल्यामुळे ही संस्था बंद करण्यात आली असून विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले. या हल्ल्यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आल्याचे चर्चच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

I strongly condemn the attack on Holy Child Auxilium school. These kind of acts will not be tolerated

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 13, 2015

दोन संशयितांनी शाळेच्या आवारात घुसून येथील सीसीटीव्ही फोडले. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या कार्यालयाची नासधूस केली. या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.