सोशल मीडियावर लालू-केजरीवाल गळाभेटीची खिल्ली

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गळाभेटीची सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे. भ्रष्टाचारावर आवाज उठविणारे केजरीवाल पाहा लालूचा कशी भेट देतात ते! लालूंच्या भ्रष्टाचार मिठ्ठीत केजरीवाल.

Updated: Nov 21, 2015, 10:56 AM IST
सोशल मीडियावर लालू-केजरीवाल गळाभेटीची खिल्ली title=

 पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गळाभेटीची सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे. भ्रष्टाचारावर आवाज उठविणारे केजरीवाल पाहा लालूचा कशी भेट देतात ते! लालूंच्या भ्रष्टाचार मिठ्ठीत केजरीवाल.

ट्विटरवर अनेकांनी लालू-केजरीवाल भेटीवर जोरदार टीका केली आहे. केजरीवाल यांना लालूंचा भ्रष्टाचार दिसला नाही का? या भेटीचे कारण काय, केजरीवाल यांचा लढा दिखावू आहे का?, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय.

दिल्लीतील भ्रष्टाचार ५ वर्षांत नष्ट करण्याचा विडा उचलणाऱ्या केजरीवाल यांना लालूंचा भ्रष्टाचार दिसला नाही का?, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.