आबरा का डाबरा! मॅच सुरु असताना रोहित शर्माने केली जादू, बेल्सची केली अदलाबदल अन्...

IND VS BAN 1st test Rohit Sharma Viral Video : रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात रोहित मैदानातील स्टंप्सवर असलेल्या बेल्सची अदलाबदल करताना दिसत आहे. 

पुजा पवार | Updated: Sep 23, 2024, 06:33 PM IST
आबरा का डाबरा! मॅच सुरु असताना रोहित शर्माने केली जादू, बेल्सची केली अदलाबदल अन्...   title=
(Photo Credit : Social Media)

IND VS BAN 1st test Rohit Sharma Viral Video : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना रविवारी चेन्नई येथे पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर 280 धावांनी मोठा विजय मिळवला आणि सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी मिळवली. या सामन्यातील रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात रोहित मैदानातील स्टंप्सवर असलेल्या बेल्सची अदलाबदल करताना दिसत आहे. 

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पारपडलेल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे आव्हान दिले होते. परंतु हे आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी घाम फोडला. अनुभवी गोलंदाज आर अश्विनने 6, जडेजाने 3 तर बुमराहने  1 विकेट घेतली. पहिल्या टेस्ट सामन्यात फलंदाजीत कॅप्टन रोहित शर्माचा परफॉर्मन्स चांगला नव्हता. रोहितने बांगलादेश विरुद्ध केवळ 11 धावा करता आल्या. 

रोहित शर्मा सामन्याची रणनीतित करण्यात माहीर आहे, तसेच तो अनेकदा मनोरंजन करताना सुद्धा पाहायला मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये टीम इंडियाची फिल्डिंग सुरु असताना रोहित शर्मा स्टंप्सवरील बेल्सची अदला-बदल करताना दिसतोय. व्हायरल झालेला व्हिडीओ दुसऱ्या इनिंगच्या 54 व्या ओव्हरपूर्वीचा आहे. 53 वी ओव्हर झाल्यावर रोहित शर्माने हळूच स्टंप्सवरील बेल्सची अदला-बदल केली. यावेळी तो तोंडाने काहीतरी पुटपुटताना सुद्धा दिसला. या व्हायरल व्हिडीओवरून लोकांनी रोहित शर्माने बेल्सची अदला-बदल करून काहीतरी जादू केल्याचा दावा केला आहे. 

पाहा व्हिडीओ : 

दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघ :  

27 सप्टेंबर पासून भारत- बांगलादेश दुसऱ्या टेस्टला सुरुवात होणार असून यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर केलाय. पहिल्या सामन्यात निवडलेल्या टीम इंडियाने उत्तम परफॉर्मन्स केल्याने बीसीसीआयने टीममध्ये कोणतेही बदल न करता हीच टीम कानपुर टेस्ट सामन्यासाठी सुद्धा जाहीर केलीये.  

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.