नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३५ हजार लोकांसोबत राजपथावर योगाभ्यास केलाय. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही सर्व मतभेद बाजूला ठेवत सहभागी झाले.
केजरीवाल योग दिनाच्या निमित्ताने रविवारी सकाळी राजपथावर पोहोचले आणि पंतप्रधान मोदी व हजारो लोकांसोबत योगाभ्यास केला. यावेळी त्यांनी योग आरोग्यासाठी चांगला असल्याचे सांगत सर्वांनी योग करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदींसोबत केजरीवालांनी बराच वेळ योगाभ्यास केला. त्यांनी योग हा शारीरिक आणि मानसिक ताणावर रामबाण उपाय असल्याचेही नमूद केलेय. बऱ्याच वादानंतर मोदींनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस जाहीर केलाय. आज पहिला योग दिवस जवळपास ३५ हजार लोकांच्या उपस्थितीत साजरा केला. यावेळी बरेच मान्यवर उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.