रात्री लग्न करायचं नाही, खाप पंचायतीचा फतवा...

आपल्या वेगवेगळ्या आणि चमत्कारिक फतव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी खाप पंचायत आता एक नवा फतवा काढला आहे.

Updated: Oct 30, 2012, 01:52 PM IST

www.24taas.com, हरयाणा
आपल्या वेगवेगळ्या आणि चमत्कारिक फतव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी खाप पंचायत आता एक नवा फतवा काढला आहे. राज्यातील बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी बालविवाहाचा प्रस्ताव मांडणार्‍या खाप पंचायतीने आता रात्री होणार्‍या लग्नांवर बंदी घालावी अशी अजब मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्याचसोबत लग्नाचा रात्री वरातही न काढण्याचा फतवा काढला आहे.
यामागचे कारण देताना खाप पंचायतीने रात्री होणार्‍या लग्नांमुळे रस्ते अपघात होतात आणि दारू पिऊन लग्नाच्या वरातीत नाचताना वादविवाद होतात असे सांगितले आहे. रात्री उशिरापर्यंत लग्न सोहळा साजरा होत असल्याने आणि त्यानंतर रात्री उशिरा वरात निघत असल्याने वेगाने वाहन चालविले जाते यामुळे अपघात होतात.
त्याचबरोबर या लग्नांमध्ये अनेक युवक दारू पिऊन नंतर गाड्या चालवतात, वादविवाद करतात. यामुळे रात्री होणार्‍या लग्नांवर बंदी घातल्यास अपघातांच्या घटना कमी होतील.