नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, यांच्या विवाहाला ५० वर्षे पूर्ण झाली, या निमित्ताने मोठ्या उत्साहात लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचा हा सोहळा , अडवाणींनी पुन्हा एकदा लग्न केल्यासारखा होता, कारण पत्नी कमला यांच्या गळ्यात अडवाणींनी वरमाला घातली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी, दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग, उत्तर प्रदेश, राजस्थान, नागालॅंडसह अन्य राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी अडवानी यांना शुभेच्छा दिल्या.
आडवाणी यांनी पत्नी कमला यांच्या गळ्यात वरमाला घातली, यावेळी त्यांची कन्या प्रतिभा उपस्थित होती. अडवाणींच्या विवाहाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच नातेवाइकांची गर्दी वाढत चालली होती.
भाजपच्या मंत्र्यांसह, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, कॉंग्रेस नेते राजीव शुक्ला, समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांच्यासह अभिनेते अन्नू कपूर, गुलशन ग्रोव्हर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.