लालू-नितीश यांच्यात दरी?, लालूंच्या भाजपला शुभेच्छा!

बिहारमधील महागठबंधन तुटण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी एक ट्वीट करून महत्वाचे संकेत दिले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 16, 2017, 06:15 PM IST
लालू-नितीश यांच्यात दरी?, लालूंच्या भाजपला शुभेच्छा! title=

पाटणा : बिहारमधील महागठबंधन तुटण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी एक ट्वीट करून महत्वाचे संकेत दिले आहेत. लालू यांनी ट्वीटमधून भाजपाच्या नव्या महायुतीला शुभेच्छा दिल्या आहेत. लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे, भाजपला नवा मित्र मिळाल्याबद्दल शुभेच्छा!

भाजपला नवा Alliance partners च्या शुभेच्छा, लालू प्रसाद झुकणार नाही किंवा घाबरणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत फॅसिस्ट शक्तींशी लढत राहणार...

दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, भाजपची हिंमत नाही, लालूचा आवाज दाबू शकेल, एका लालूचा आवाज दाबला तर देशभर करोडो लालू तयार होतील. मी गिधाडांच्या धमकीला घाबरणार नाही. यानंतर आणखी एका ट्ववीटमध्ये लालूंनी म्हटलं आहे, अरे शिकलेल्या असाक्षरांनो कोणकोणत्या २२ ठिकाणी छापा मारला ती ठिकाणं तरी सांगा. भाजपला पाठिंबा देणारी मीडिया आणि सहयोगी घटकांना लालू घाबरत नाही.

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, लालू आणि नितीश कुमार यांच्या युतीत सर्व काही ठिक चाललंय असं काही नाही.सोमवारी नितिश कुमार यांनी पंतप्रधानाच्या रेसमध्ये आपण असल्याचं सांगून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांगलीच वाहवा केली होती. 

तसेच जमीन घोटाळा प्रकरणात नितीश यांनी म्हटलंय, सरकारला वाटत असेल तर त्यांनी चौकशी करून घ्यावी. याआधी नितिश कुमार यांनी ईव्हीएमच्या मुद्यावर भाजपाची बाजू घेतली आहे. यावरून लालू यादव नितिश कुमार यांच्यावर रागावलेले आहेत.