नवी दिल्ली : उत्तराखंडात येत्या बुधवारी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.
येत्या बुधवारी उत्तरप्रदेशातल्या 11 जिल्ह्यातल्या 68 जागांसाठीही मतदान होणार आहे. त्यासाठीही सुरू असलेला प्रचारही आज संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांचे स्टार प्रचारक सध्या दोन्ही राज्यांच्या प्रचार मैदानात आहेत.
रविवारी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधीपक्ष असणाऱ्या भाजपनं दिवसभर प्रचाराचा धडाका उडवला. 72 किलोमीटर रथयात्रा राहुल गांधींनी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी भव्य रो शो केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरिद्वारमधअये सभा घेतली. आजही असाच प्रचाराचा धुरळा बघायला मिळेल. उत्तराखंड विधानसभेसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.