कैलास सत्यार्थी यांच्या नोबेल प्रतिकृती चोरीचा छडा

कैलाश सत्यार्थींच्या राहत्या घरी झालेल्या चोरीचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 12, 2017, 08:57 PM IST
कैलास सत्यार्थी यांच्या नोबेल प्रतिकृती चोरीचा छडा title=

नवी दिल्ली : नोबेल शांती पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थींच्या राहत्या घरी झालेल्या चोरीचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

नोबेलच्या प्रतिकृतीच्या चोरीचा छडा लावण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केलाय. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिल्लीतल्या कैलाश कॉलनीत सत्यार्थींचं घर आहे. सात फेब्रुवारीला सत्यार्थी यांच्या घरातून चोरट्यांनी त्यांना मिळालेले नोबेल मानचिन्ह आणि मानपत्रं तसंच मुद्देमाल लांबवला होता.