नवी दिल्ली : आयआयएम शिलाँग लेक्चर देण्यासाठी डॉ.कलाम आले होते. तेव्हा त्यांच्या सोबत त्याचा सचिव श्रीजन पाल सिंह देखिल होता, श्रीजन पाल सिंह म्हणतो, शिलाँग आयआयमला आम्ही पोहोचलो, त्यानंतर आम्ही लेक्चर हॉलला गेले, डॉ. कलाम यांना लेक्चरसाठी लेट व्हायचं नव्हतं, ते म्हणत होते, "विद्यार्थ्यांना कधीच वाट पाहायला लावू नये."
मी स्टेजवर लवकरच त्यांचा माईक सेट केला, मी जेव्हा त्यांचा माईक लावत होतो, तेव्हा त्यांनी हसत हसत म्हटलं, "फनी गाय, ठिक आहेस ना तू?"
मी देखिल हसतच म्हणलो, "हो."
डॉ. कलाम यांचे शेवटचे शब्द होते...
भाषण सुरू होण्यात दोन मिनिटं होते, मी त्यांच्या पाठिमागे येऊन बसलो, अचानक एक स्मशान शांतता पसरली, डॉ. कलाम खाली कोसळले.
मी त्यांना उचललं, जोपर्यंत डॉक्टर येत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व काही केलं जे करता येऊ शकतं.
मी त्यांचे ते तीन-चतुर्थांश बंद डोळे कधीच विसरू शकत नाही, मी एका हाताने त्यांचं डोकं सांभाळलं आणि त्यांना शुद्धीत आणण्याचा सर्व काही प्रयत्न केला. त्यांचे हात आखडले गेले आणि माझ्या हातात फसल्यासारखे झाले. ते शेवटी काहीही बोलले नाहीत.
ते स्थिर होते, ते विव्हळलेही नाहीत, डॉ.कलाम यांचा चेहराही स्थिर होता, असं वाटतं होतं की, त्यांच्या अचल डोळ्यांमधून ज्ञानाचा प्रकाश बाहेर पडतोय.
पाच मिनिटात आम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये होतो, पुढील काही मिनिटांत त्यांनी सांगितलं की, मिसाईल मॅन डॉ. कलाम आपल्यात नाहीत, नेहमीसाठी. मी आणखी शेवटच्या वेळेस त्यांच्या पाया पडलो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.