गारवाडा : मध्यप्रदेशमधील गाडरवाडा गावात स्वच्छ भारत अभियान अनोख्या पद्धतीने राबवण्यात येत आहे. या पद्धतीमुळे आता कोणीही उघड्यावर शौचास जाण्याची हिंमत करत नाही.
गावातील सरकारी यंत्रणेने ग्रामस्थांच्या मदतीने एका पथकाची स्थापना केली आहे, हे पथक उघड्यावर शौचाला जणाऱ्यांना बघून जोरजोरात शिट्टी वाजवतात. त्यामुळे समोरचा व्यक्ती कंटाळून उघड्यावर शौचावर जाणे बंद करतो.
हे पथक गावातील अन्य लोकांना उघड्यावर शौचास गेल्याने होणारे दुष्परिणामही समजावून सांगतात. आता या गावात जलयोजनाही राबवण्यात येत असून या गावातील विकासयात्रा बघून अन्य गावातील ग्रामस्थही आता स्वच्छता अभियानासाठी पुढाकार घेत आहेत.
स्वच्छ भारत अभियान गावागावात पोहोचवण्यासाठी मध्य प्रदेशमधील सरकारी यंत्रणांनी कंबर कसली असून जिल्हाधिकारी महेशचंद्र चौधरी यांनी स्वच्छतेसाठी नवीन शक्कल लढवली. त्यांनी गाडरवाडा गावातील ग्रामस्थांसोबत चर्चा करुन गावातील घराघरात शौचालय बांधण्यावर भर दिला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि गावातील घराघरात शौचालय बांधण्यात आले.
मात्र यानंतरही उघड्यावर शौचासाठी जाण्याची पद्धत बंद पडणार नव्हती. यावर लगाम लावण्यासाठी चौघरी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने एक बाल पथक तयार केले. हे पथक उघड्यावर शौचाला जाणारा किंवा बसलेला व्यक्ती दिसला की जोरजोरात शिट्टी वाजवून त्याच्या नाकी नऊ आणतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.