पत्नीने पतीसह त्याच्या प्रियेसीला जिवंत जाळलं

एका महिलेने पती आणि त्याच्या प्रेयसीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. तमिळनाडूमधील नमाक्कल येथील या घटनेत दोघेही ७० टक्के भाजले आहेत.

Updated: Jul 13, 2015, 10:24 PM IST
पत्नीने पतीसह त्याच्या प्रियेसीला जिवंत जाळलं title=

नमाक्कल : एका महिलेने पती आणि त्याच्या प्रेयसीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. तमिळनाडूमधील नमाक्कल येथील या घटनेत दोघेही ७० टक्के भाजले आहेत.

पी. राजा हा त्याची प्रियेसी पुष्पावती हिच्या घरी रविवारी गेला होता. याबाबतची माहिती पी. राजाच्या पत्नीला समजली. तिने पुष्पावतीचे घर गाठले. घरामध्ये दोघे झोपले असल्याचे पाहिल्यानंतर तिने घराला बाहेरून काडी लावली, एवढंच नाही तर घराच्या बाजूने रॉकेल ओतून घर पेटवून दिले. 

मात्र काही वेळातच घराला चारी बाजूंनी लागली. दोघांच्या ओरडण्याच्या आवाजाने नागरिक गोळा झाले. स्थानिकांनी आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच दोघांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, रुग्णालयात दोघांवरही उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.